नवी दिल्ली- भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. मी १०० टक्के कर्ज फेडायला तयार आहे, मी मुद्दलीची परतफेड करु शकेन पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे.
भारतातील
प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा आरोपही त्याने केला आहे. ऑगस्टा वेस्टलँड
हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपीचे प्रत्यार्पण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विजय
मल्ल्याने ट्विटरवरुन बँकांच्या थकीत कर्जावर भाष्य केले आहे. विजय मल्ल्या म्हणतो, किंगफिशर मद्य
क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून गेल्या तीन दशकापासून कंपनी भारतात व्यवसाय
करत आहे.